Ad will apear here
Next
रत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा


रत्नागिरी : ‘भारतात बांबूपासून १८ हजार कोटी आर्थिक उलाढाल होते. व्हेपर ट्रिटमेंटद्वारे बांबूचे आयुष्य वाढवू शकतो. पर्यावरणपूरक घर बांधण्यासाठी बांबूचा उपयोग करावा. आता नव्या जमान्यात घरामध्ये बांबूच्या कलाकृती ठेवल्या जातात. सिलिंग व फ्लोअर टाइल्सही बसवल्या जात आहेत. बांबूपासून बायोडिझेल व वीज निर्मिती शक्य आहे. बांबू क्लस्टर, बांबू प्रवर्तक कंपनी, अर्थसाह्य यांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे अजित भोसले यांनी केले.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात बांबू कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्यातून शेतकरी बांबू लागवडीतून कोट्यवधी रुपये मिळवत आहेत; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बाजारपेठ, हमी भाव व लागवड नसल्यामुळे हे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सिंधुदुर्गातील बांबू उत्पादक अभ्यासक मिलिंद पाटील, कृषीतज्ञ डॉ. दिलीप नागवेकर उपस्थित होते.



या वेळी मार्गदर्शन करताना मिलिंद पाटील म्हणाले, ‘रत्नागिरीतील शेतकर्‍यांनी समूहाने येऊन सिंधुदुर्गातील बांबू नर्सरी, प्रक्रिया उद्योग पाहावेत, शेतकर्‍यांना भेटावे. दर दोन वर्षांआड तोड केल्यास वर्षाला एकरी एक ते अडीच लाख उत्पन्न मिळू शकते. यासाठी बाजारपेठ उपलब्ध हवी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने यंदा एक हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. इथला बांबू केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राजस्थानात निर्यात झाला आहे. रत्नागिरीतील लोकसुद्धा उद्योजक बनू शकतात.’

‘बांबू लागवडीत आठ बाय १५ फुटाची जागा मोकळी ठेवावी. निचरा होणारी जमीन असावी व अति पाण्यामुळे कंद, मुळे कुजता कामा नयेत. शाखीय, पेर/कांडी रोपे व टिश्यू कल्चरने लागवड करता येते. खड्ड्यात लेंडी, शेण, पाला पाचोळा घालावा. दक्षिणेला तिरके करून लागवड करावी. खत घालावे. योग्य लक्ष देऊन लागवडीवरील वेली तोडाव्यात. पाणी जास्त दिल्यास कोंब येतात व त्यामुळे माकड, डुक्कर गवे त्रास देऊ शकतात. पेरावरचे आवरण जाऊन डाग पडलेले असतात ती काठी टिकाऊ, मजबूत असते,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क : मिलिंद पाटील, कुडाळ-  ९१३०८ ३७६०२.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZLQBY
Similar Posts
रत्नागिरीत द्विजिल्हास्तरीय तबलावादन स्पर्धा रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पातळीवरील तबलावादन स्पर्धा १५ ऑक्टोबरला रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान प्रख्यात तबलावादक फजल कुरेशी, र्‍हिदम अ‍ॅरेंजर नितीन शंकर व राकेश परिहस्त यांची जुगलबंदी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये खारफुटी वन संवर्धन कार्यक्रम रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग ‘मँग्रुुव्ह सोसायटी ऑफ इंडिया’शी संलग्न असून, यामार्फत खारफुटीच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील आचरा
‘गोगटे-जोगळेकर’ला पावणेदोन लाखांची पारितोषिके महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची महाअंतिम फेरी सहा जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांचे नाट्याविष्कार या वेळी झाले
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये तीन ऑगस्टला ‘मैत्र’चे आयोजन रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्र’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात होईल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language